नव्या शतकाची नांदी

भाषा ही सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. भाषेचे जीवनानुभवाशी साक्षात नाते असते. 'भाषा आणि जीवन' च्या पहिल्या अंकाच्या संपादकीयात म्हटल्याप्रमाणे जीवनाचा अनुभव घेण्याची ज्याची त्याची लकबच अखेर एक भाषिक लकब असते! भाषा आणि जीवन यांच्यातील अनेकपदरी नात्याचा सर्वसामान्य वाचकांना प्रत्यय येत असतो तर त्याच्यातील गुंतागुंत अभ्यासकांना जाणून घ्यावीशी वाटते. भाषा ही लोकव्यवहाराचे साधन असते, ज्ञानव्यवहाराचे माध्यम असते, ती संस्कृतीची वाहक असते आणि कलात्मक निर्मितिव्यवहारात ती जणू अनुभवाचे द्रव्य असते. व्यक्‍तीच्या भावजीवनात ती भावना, विचार व संवेदना यांचे केंद्रच असते, भाषेच्या अशा जीवनव्यापी अस्तित्वाचे काही पैलू 'भाषा आणि जीवन' च्या अंकांमधून उलगडले जातात; असे वाचकांना आढळेल.

इतिवृत्त : वार्षिक सर्वसाधारण सभा २००७-२००८

मराठी अभ्यास परिषदेची २००७-२००८ या आर्थिक वर्षाची बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा दि॰ २२ जून २००८ रोजी सायंकाळी ५ वाजता भारत इतिहास संशोधन मंडळाचे सभागृह, सदाशिव पेठ, पुणे येथे आयोजित केली होती. गणसंख्येअभावी सभा १५ मिनिटे स्थगित होऊन ठीक ५.१५ वाजता सुरू झाली. सभेचे अध्यक्ष प्रा॰ प्र॰ ना॰ परांजपे हे होते.

शंभराव्या अंकाचे संपादकीय: साहित्याचे सांस्कृतिक संदर्भ आणि भाषांतर

विल्यम गोल्डिंगच्या 'लॉर्ड ऑफ दी फ्लाईज' या कादंबरीच्या अखेरीस येणार्‍या ब्रिटिश नाविक अधिकार्‍याच्या तोंडी एक वाक्य आहे.: "I know Jolly good show, Like the Coral Island" ("आय नो, जॉली गुड शो, लाइक द कोरल आयलंड"). या कादंबरीचे जी०ए० कुलकर्णी यांनी मराठी भाषांतर केले आहे.

'भाषा आणि जीवन' चे रौप्यमहोत्सवी वर्षाचे अंक


भाषा आणि जीवन अंक : हिवाळा २००७

भाषा आणि जीवन अंक : उन्हाळा २००७

भाषा आणि जीवन अंक : पावसाळा २००७

भाषा आणि जीवन अंक : दिवाळी २००७

'भाषा आणि जीवनच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील अंकांच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील (व नंतरच्याही) अंकांच्या मुखपृष्ठांवर महत्त्वाच्या भाषाअभ्यासकांना सादर ...

पन्नासाव्या अंकाचे संपादकीय : पन्नासावा अंक

'भाषा आणि जीवन'चा हा अंक पन्नासावा आहे. 'भाषा आणि जीवन'ची मातृसंस्था, मराठी अभ्यास परिषद, १ जानेवारी, १९८२ रोजी अस्तित्वात आली. आता संस्थाही पंधराव्या वर्षात पदार्पण करीत आहे; आणि 'महाराष्ट्र फाउंडशेन'ने प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या पारितोषिकासाठी निवडलेल्या तीन वैचारिक नियतकालिकांमध्ये 'भाषा आणि जीवन'ची नुकतीच निवड केली आहे. म्हणून या टप्प्यावर थोडे मागे वळून पाहावे, असे वाटणे साहजिकच आहे.

...हिचे पांग फेडू

'भाषा आणि जीवन' या त्रैमासिकाची रौप्यमहोत्सवी वाटचाल म्हणजे मराठीच्या भाषिक-सांस्कृतिक पर्यावरणातील एक महत्त्वाची घटना आहे. १ जानेवारी १९८२ मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या मराठी अभ्यास परिषदेचे हे नियतकालिक. भाषेचा विकास होण्यासाठी तिचा प्रसार होणे जसे महत्त्वाचे असते. तसेच भाषेला प्रतिष्ठा मिळण्यासाठी तिचा कस टिकवणेही गरजेचे असते. यासाठी कार्यरत राहिलेल्या 'भाषा आणि जीवन' ला महाराष्ट्र फाउंडेशनचा वैचारिक नियतकालिकाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.
२००७ मध्ये 'भाषा आणि जीवन' या त्रैमासिकाच्या पंचविसाव्या वर्षातील अंक वाचकांपर्यंत पोहोचले आहेत. 'भाषा आणि जीवन'ची ही रौप्यमहोत्सवी वाटचाल म्हणजे मराठीच्या भाषिक-सांस्कृतिक पर्यावरणातील एक महत्त्वाची घटनाच आहे.

Font help