मराठीचे डोळे. इंग्रजीची खिडकी.
शब्दसंक्षेप, वाक्यसंक्षेप
द०भि० कुलकर्णी
संपा० 'भाजी' यांस
स०न०वि०वि०
आ० व 'भाजी'च्या संपा०समि०च्या एक सद० मृ०श० असे आ० दो०नी मि० लिहि० संपा० टि०वा०सं० : भाजी व० २५, अं०१, हि०'०७.
अबब! संक्षिप्त रूपात वाक्य लिहिणे किती जिकिरीचे ते आता लक्षात आले. अशा प्रयत्नामत वेळ व श्रम, प्रारंभी तरी, वाचत नाहीत; वाचकासही, वाचक म्हणून असाच अनुभव येईल... पुढे वाचा »
डॉ० नीलिमा गुंडी या मराठी काव्यसमीक्षेच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या विमर्शक आहेत. त्या स्वत: कवयित्री आहेत. तसेच मराठी कवितेच्या काही चांगल्या संपादनांमध्येही त्यांचा सहभाग आहे. 'लाटांचे मनोगत' हे त्यांचे काव्यसमीक्षेचे पहिलेच प्रकाशित पुस्तक होय... पुढे वाचा »
हैदराबादेतील मराठी समाजाचे मराठी विषयाचे प्रेम जागृत होते व ते अस्सल होते. १९५५ ते १९५८ हा काळ अंशत: संभ्रमात गेला. त्याच वेळी दक्षिण भारतात प्रचलित असलेल्या सरकारमान्य व विद्यापीठमान्य ओरिएंटल लॅंग्वेजिज या परीक्षांचे अभ्यासक्रम समोर आले. प्राज्ञ, विशारद ऐवजी ओरिएंटल लॅंग्वेज पदविका व पदवी हे नामाभिधान झाले. हे कार्य करण्यासाठी मराठी संस्था असणे गरजेचे होते. त्यातून समाजाची ऊर्मी ओळखून संस्था स्थापन झाली - मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश व लगेच वर्गांना आरंभ झाला.... पुढे वाचा »
साहित्याच्या रसिक वाचकांची अभिरुची प्रत्येक पिढीनुसार बदलत असते. अभिरुचीच्या या घडणीत समकालीन साहित्याचा फार मोठा वाटा असतो. साहित्यातील संक्रमणाची नोंद प्रत्येक पिढी आपापल्या परीने घेत असते. डॉ० नीलिमा गुंडी यांचे 'अक्षरस्पंदन' हे पुस्तक प्रामुख्याने अशा समकालीन कवी आणि लेखकांच्या साहित्या-विषयी आपले अनुभवकथन करते. 'रसिकांमधल्या सुप्त प्रतिभाशक्तीला समर्पित' असे हे पुस्तक अनेक प्रतिभावंतांच्या साहित्यनिर्मितीचा मागोवा घेते. 'रसिकांमधल्या सुप्त प्रतिभाशक्तीला समर्पित' असे हे पुस्तक अनेक प्रतिभावंतांच्या साहित्यनिर्मितीचा मागोवा घेते.... पुढे वाचा »
वास्तविक पाहता भारतीय समाजातील भाषाभेद हे भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे मूलाधार आहेत. या भाषाभेदांची समाजातील जातिभेदांशी तुलना करून त्यांना विकृती मानणे गैर आहे. अज्ञानमूलक आहे.... पुढे वाचा »
गोडसे भटजींचे 'माझा प्रवास : १८५७ च्या बंडाची हकिगत' हे पुस्तक प्रथम प्रसिद्ध झाले (१ डिसेंबर १९०७) या घटनेला २००७ मध्ये शंभर वर्षे झाली. तसेच १८५७च्या स्वातंत्र्यलढ्यालाही दीडशे वर्षे पूर्ण झाली. हे निमित्त साधून या पुस्तकाची नव्याने संपादित केलेली आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.... पुढे वाचा »
अर्वाचीन मराठी साहित्य समीक्षेमध्ये पाश्चात्य तत्त्वमीमांसा, वादसंकल्पना आणि अनेक संज्ञांचा सढळपणे वापर होत आला आहे. मात्र सन्माननीय अपवाद वगळता, हा वापर नेमकेपणाने, मुळाबरहुकूम, काटेकोरपणे न होता सैलपणे आणि खूपसा बेजबाबदारपणे होत आला आहे आणि त्याला मूलार्थाची प्रतिष्ठाही लाभत आली आहे. असे विपरीत आणि चुकीचे अर्थ प्रस्थापित होऊ नयेत असे वाटत असेल तर अशा लेखनाचे मुळातूनच ज्यांनी व्यवस्थित वाचन केले आहे आणि ज्यांना ते कळले आहे, अशा अभ्यासकांनी मराठीतून त्या त्या विषयावरचे लेखन करायला हवे. इंग्रजी भाषा आणि साहित्यासह पाश्चात्य तत्त्वविचारांचा सखोल अभ्यास आणि ज्ञान असणार्या मिलिंद मालशे आणि अशोक जोशी यांनी लिहिलेल्या आणि मुंबई विद्यापीठ व मौज प्रकाशन यांनी संयुक्तरीत्या प्रकाशित केलेल्या 'आधुनिक समीक्षा सिद्धान्त', या ग्रंथाचे मोल आणि महत्त्व म्हणूनच लक्षणीय स्वरूपाचे आहे.... पुढे वाचा »
डॉ० माधवराव पटवर्धन यांचा 'छंदोरचना' हा ग्रंथ १९३७ साली प्रकाशित झाला. छंद हे पद्याचे आवश्यक अंग आहे. या छंदाचे नियमन करणार्याथ छंद:शास्त्राचा प्राचीन आणि संपन्न वारसा आपल्याला लाभलेला असला तरी 'पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना' हा सिद्धांत डॉ० पटवर्धन यांनी मांडला आणि समग्र पद्यरचनेला लावून दाखविला. त्यामुळे छंद:शास्त्राच्या पारंपरिक अभ्यासाला एक नवी दिशा आणि एक नवे परिमाण मिळाले.... पुढे वाचा »
स्वयंपाकघराच्या रचना, तेथील वस्तू, त्यांचा वापर - सारेच बदलत आहे. आठवलं एका अगदी छोट्या टोपलीवरून. माझ्याहून सहासात वर्षांनी मोठी असलेली माझी आतेबहीण माझ्याकडे ती टोपली पाहून उद्गारली, 'अगो बाई मीना, तुझ्याकडे किती छान कुरकुला आहे.'' किती वर्षांनी कानावर पडला तो शब्द, मग आठवली दुरडी -.... पुढे वाचा »
भाषेमधे शब्द नाण्यासारखे असतात. ते सतत बोलीभाषेत, व्यवहारात, वाङ्मय-व्यवहारात सतत 'चालते' हवेत. नाण्याला फक्त अर्थ असतो. परंतु शब्द अर्थपूर्ण असतो. तो जीवनाशी साक्षात जोडलेला असतो. तो ज्यावेळी जीवनापासून तुटतो तेव्हा तो भाषेतून हद्दपार होण्याची प्रक्रिया नकळत सुरू होते.... पुढे वाचा »