नाव
विजय प्रभाकर पाध्ये
परिचय
सर्वोच्च अधिकारपदावरील व्यक्तींसाठी एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्रेटरी, एक्झिक्युटिव्ह अॅसिस्टंट अशांसारख्या पदांवर पुण्यातील तीन उद्योगसमूहांमध्ये एकूण ३२ वर्षे नोकरी. सन १९९८ पासून विविध उद्योगसमूहांच्या अंतर्गत वितरणासाठी प्रकाशित केल्या जाणार्या गृहपत्रिकांचे संपादन, अभियांत्रिकी, मानव-संसाधन, औद्योगिक संबंध, विकृतिशास्त्र, दूरसंचार वगैरे विविध क्षेत्रांतील मूळ इंग्लिशमधील दस्तावेजांचे मराठीत अनुवाद करण्यात [स्वतंत्र (फ्री-लान्सर) अनुवादकर्मी म्हणून] कार्यरत. कोल्हापूरच्या एका नामांकित प्रकाशन संस्थाचालकांच्या कुटुंबात जन्म व पालनपोषण झाल्याने लेखन-प्रकाशन क्षेत्राची व मराठी भाषाव्यवहाराची विशेष आवड.
