मराठीचे डोळे. इंग्रजीची खिडकी.
अरुणाचलमध्ये सापडली दुर्मिळ भाषा
अरुणाचल प्रदेशातील एका दुर्गम भागात बोलली जाणारी अज्ञात भाषा शोधून काढली आहे. जेमतेम ८०० जण बोलत असलेली ही भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पुढे वाचा »
अभिनंदन
या वर्षीचा मराठी ग्रंथासाठी असलेला साहित्य अकादमी पुरस्कार डॉ० अशोक रा० केळकर यांच्या 'रुजुवात' (लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई) या ग्रंथास मिळाला आहे. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये व प्रमाणपत्र असे आहे. पुरस्कारवितरणाचा कार्यक्रम फेब्रुवारी २०११ मध्ये होईल. डॉ० केळकरांचे मन:पूर्वक अभिनंदन! [या ग्रंथाचे डॉ० सीताराम रायकर यांनी लिहिलेले परीक्षण 'भाषा आणि जीवन'च्या दिवाळी २००९ (वर्ष २७, अंक ४) या अंकात प्रसिद्ध झाले आहे.]
महाबँक भाषाविषयक लेखन पुरस्कार पुढे वाचा »
ज्याप्रमाणे लोकसभेत तात्काळ भाषांतर ऐकू येण्याच्या व्यवस्थेमुळे तमीळ व इतर प्रादेशिक भाषा वापरता येतात त्याप्रमाणे उच्च व सर्वोच्च न्यायालयांतही प्रादेशिक भाषांचा वापर करणे शक्य आहे का ह्याचा अभ्यास करण्याचा आदेश केंद्र सरकारला देण्यात यावा अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पुढे वाचा »