हेमंत गोविंद जोगळेकर

मराठी कविता : प्रमाणभाषेकडून बोलीभाषेकडे

हेमंत गोविंद जोगळेकर

एका भाषिक प्रदेशातील बोलीभाषा स्थलानुसार बदलत असली तरी लिखित भाषा मात्र बव्हंशी एकच प्रमाणभाषा असते. कवितेची भाषा लिखित गद्य भाषेपेक्षा वेगळी राहिलेली आहे. तिला केवळ सांगायचे नसते. ते सांगणे प्रतीतही करायचे असते. त्यासाठी ती प्रमाणभाषेकडून बोलीभाषेकडे वळत असते. काव्य संस्कृताधिष्ठित असताना केशवसुतांची कविता साध्या मराठीतून आली. त्यासाठी त्यांना त्या काळी शब्ददरिद्रीही म्हणवून घ्यावे लागले. त्यांचा नवा शिपाई

जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत
सर्वत्र खुणा माझ्या मजला घरच्या दिसताहेत
पुढे वाचा »

मराठी कवितेची बदलती भाषा

आपण सगळे मराठी भाषा बोलतो-लिहितो. भाषा कालानुसार बदलत जाते. स्थळानुसारही बदलते. साहित्याची भाषाही अशी बदलत आलेली आहे. पण जेव्हा आपण कवितेच्या भाषेचा वेगळा विचार करतो, तेव्हा कवितेची भाषा वेगळी असते असे गृहित धरतो. कवितेची म्हणून काही वेगळी भाषा असते का? या संदर्भात मला पु०शि० रेगे यांची दोन विधाने आठवतात. एक : कवितेला ठाम अशी भाषा नसते. दोन : कविता हीच एक भाषा असते. वरवर पाहता ही दोन विधाने परस्परविरोधी वाटतील. पण ती तशी नाहीत. उपलब्ध भाषा कवी कवितेच्या गरजेप्रमाणे वाकवीत असतो. पुढे वाचा »