संकेतस्थळावर आजवर प्रकाशित झालेले लेखन

शंका आणि समाधान

...समाधान

(संदर्भ: भाषा आणि जीवन : अंक २५.४ दिवाळी २००७)

१. स्वल्पविराम - 'की'च्या आधी की 'की'नंतर ?

आगळा वेगळा सन्मान...

मुंबईजवळ एका गावात संगणक-चलित कापडमाग जुळवण्याचे काम चालू होते. इटालियन यंत्रतंत्रज्ञानाच्या सूचना मी आपल्या गिरणीकामगारांना हिंदी भाषेतून सांगत होतो. अवघ्या दोन दिवसांत १० कापडमाग जुळवून झाले व कापड-उत्पादन सुरू करण्याची वेळ येऊन ठेपली. इटालियन तंत्रज्ञ स्वतःवर व एका विशेष तरबेज कामगारावर इतका खूष झाला, की त्याला मागे एक लाथच मारली. परिणाम उलटा झाला. काम थांबले. हमरीतुमरीवर येऊन तो कामगार इटालियन तंत्रज्ञाशी भांडू लागला. बाकीचे त्याला सामील झाले. 'माध्यम' आणि 'मध्यस्थ' या दोन्ही भूमिका करून मी ते भांडण सोडवले. उत्पादन सुरू झाले, तशी तो इटालियन गाऊ, नाचू लागला, टाळ्या पिटू लागला. मी त्याच्यापासून दहा पावले दूर सरकलो व टाळ्या पिटू लागलो. काही इटालियन लाथ मारून कौतुक करतात, हे नवीन ज्ञान मला झाले होते.

- य०चिं० देवधर (डॉ० कल्याण काळे व डॉ० अंजली सोमण संपादित 'भाषांतरमीमांसा' ह्या पुस्तकातून)

इतिवृत्त : वार्षिक सर्वसाधारण सभा २००७-२००८

मराठी अभ्यास परिषदेची २००७-२००८ या आर्थिक वर्षाची बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा दि॰ २२ जून २००८ रोजी सायंकाळी ५ वाजता भारत इतिहास संशोधन मंडळाचे सभागृह, सदाशिव पेठ, पुणे येथे आयोजित केली होती. गणसंख्येअभावी सभा १५ मिनिटे स्थगित होऊन ठीक ५.१५ वाजता सुरू झाली. सभेचे अध्यक्ष प्रा॰ प्र॰ ना॰ परांजपे हे होते.

नव्या शतकाची नांदी

भाषा ही सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. भाषेचे जीवनानुभवाशी साक्षात नाते असते. 'भाषा आणि जीवन' च्या पहिल्या अंकाच्या संपादकीयात म्हटल्याप्रमाणे जीवनाचा अनुभव घेण्याची ज्याची त्याची लकबच अखेर एक भाषिक लकब असते! भाषा आणि जीवन यांच्यातील अनेकपदरी नात्याचा सर्वसामान्य वाचकांना प्रत्यय येत असतो तर त्याच्यातील गुंतागुंत अभ्यासकांना जाणून घ्यावीशी वाटते. भाषा ही लोकव्यवहाराचे साधन असते, ज्ञानव्यवहाराचे माध्यम असते, ती संस्कृतीची वाहक असते आणि कलात्मक निर्मितिव्यवहारात ती जणू अनुभवाचे द्रव्य असते. व्यक्‍तीच्या भावजीवनात ती भावना, विचार व संवेदना यांचे केंद्रच असते, भाषेच्या अशा जीवनव्यापी अस्तित्वाचे काही पैलू 'भाषा आणि जीवन' च्या अंकांमधून उलगडले जातात; असे वाचकांना आढळेल.

ऊंझा-जोडणी

ऊंझा-जोडणी म्हणजे गुजराती भाषा परिषदेने (मूलतः भाषाशुद्धी अभियान) ऊंझा येथे भरविलेल्या अधिवेशनात घेतलेल्या निर्णयानुसार (ठरावाप्रमाणे) ऱ्हस्व-दीर्घ अशा दोन-दोन इ-ई, उ-ऊ, ऐवजी फक्त एकच ई व ऊ चा वापर करावा, अर्थात फक्त दीर्घ ई ( ‍ी ) व ऱ्हस्व उ ( ‍ु ) चीच चिन्हे वापरली जावीत असा निर्णय घेण्यात आला. (उदा. वीद्या, शीक्षक, वीनंती, रुप, वधु, धुर इ.)

लेखन हवे आहे

पुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :
मराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील), भाषिक व भाषाशिक्षणविषयक संशोधन, परिभाषा, भाषिक वर्तन, भाषाविषयक शैक्षणिक व शासकीय धोरणे...

कमरखुलाई

जीवनात अनुभव नेमक्या शब्दात सांगण्याचे साधन म्हणजे भाषा. फार नाही पण साधारण दिडशे वर्षांपूर्वीचे हिशेबाचे कागद वाचत असताना एका ठिकाणी 'कमरखुलाई रु.१०/- दिले' असा उल्लेख होता.

संस्कृत आणि प्राकृत

कालिदासाने देवदेवतांच्या विवाहाचे वर्णन केले असले तरी विधींचे तपशील मात्र त्याच्या समकालीन समाजातल्या चालीरीतींचेच आहेत. भारतात सामाजिक विधी-उत्सव शेकडो वर्ष साजरे होत आले आहेत. त्यामुळे भाताची कोवळी रोपे अंगावर टाकण्याच्या विधीला चौथ्यापाचव्या शतकातला कालिदास 'लौकिक' म्हणतो आणि चौदा-पंधराव्या शतकातला मल्लिनाथ 'लौकिक आचार मनानेही डावलू नये' असा त्याला शास्त्राधार देतो.

तेलुगु-मराठी शब्दयोजन

भाषेची काही एक विशिष्ट प्रवृत्ती असते. काही विशिष्ट वाक्प्रयोग असतात. तत्सम शब्दांचे अर्थ व भावही त्यात अनेक वेळा बदललेले दिसतात. मराठीपेक्षा वेगळ्या वाटणाऱ्या तेलुगूतील शब्दांच्या अर्थच्छटांचा विचार करून पुढील उतारा सिद्ध केला आहे.

विचारा प्रश्न

नेहमीच्या बोलण्यात आपल्याला अनेक लहानसहान भाषिक प्रश्न पडतात, शंका येतात. उदा० 'ती बाग' बरोबर की 'तो बाग'.. अशा शंकांचे समाधान करून घ्यायचे असल्यास इथे प्रश्न विचारा.

Font help