नेहमीच्या बोलण्यात आपल्याला अनेक लहानसहान भाषिक प्रश्न पडतात, शंका येतात. उदा० 'ती बाग' बरोबर की 'तो बाग'.. अशा शंकांचे समाधान करून घ्यायचे असल्यास इथे प्रश्न विचारा.
'रेडी रेकनर'आणि 'सोफिस्टिकेटेड'हे दोन शब्द अनेक वेळा वर्तमानपत्रांतून, तसेच बोलण्या-चालण्यात वापरले जातात. ह्या शब्दांसाठी समर्पक मराठी प्रतिशब्द सुचवावेत अशी मी विनंती करतो.
'रेडी रेकनर' ह्या शब्दासाठी महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या पारिभाषिक संज्ञाकोशात 'शीघ्र गणक'अशी नोंद आहे. सोफिस्टिकेटेड ह् शब्द व्यक्तींबाबत वापरला जातो, त्याचप्रमाणे एखादी गुंतागुंतीची रचना असलेली यंत्रणा,यंत्रसामग्री,साधन अशांबाबतही वापरला जातो. शब्दार्थकोशात दिलेले विविध अर्थ असे दिले आहेत : intellectually appealing to those having worldly knowledge and refinement and savoir faire; marked by wide-ranging knowledge and appreciation of many parts of the world arising from urban life and wide travel; ahead in development; complex or intricate system.
पावसाळा २००८च्या 'भाषा आणि जीवन'मध्ये सत्वशीला सामंत ह्यांचा 'प्रचलित शासनमान्य लेखन-नियमावली : काही मतभेद' हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात, शुद्धलेखन नियम ५ संबंधातील विवरण करताना संदर्भ म्हणून 'ज्ञानेश्वरीची प्रस्तावना' आणि 'ज्ञानेश्वरीतील मराठीचे व्याकरण' ह्या ग्रंथांचा उल्लेख करून त्यांचे संपादक कै० वि०का० राजवाडे आणि कै० शं०गो० तुळपुळे असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, पुढे कै० मो०के० दामले ह्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. लेखक-संपादक वगैरेंचा उल्लेख करताना 'कै०' लिहिणे कितपत योग्य आहे? ग्रंथलेखन वा संपादन करताना ही मंडळी हयात होतीच. त्यामुळे, आणि 'कै०' ही काही 'प्रा०', 'डॉ०' सारखी उपाधी नसल्यामुळे तसा उल्लेख करू नये असे मला वाटते. ह्याबाबत शंकानिरसन करावे अशी विनंती आहे. —
प्रतिसाद
समर्पक मराठी प्रतिशब्द हवेत

कृपया प्रतिसाद द्यावा.
विजय पाध्ये
लेखक-संपादक वगैरेंचा उल्लेख करताना 'कै०' लिहिणे कितपत योग्य