
मुखपृष्ठ: अनिल अवचट
प्रा. प्र.ना. परांजपे : अध्यक्ष
संस्थेचे संस्थापक सदस्य. 'भाषा आणि जीवन' चे प्रमुख संपादक, पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्याविभागाचे माजी प्रमुख. 'कविता दशकाची', 'कविता विसाव्या शतकाची' या संपादित प्रकल्पाचे संयोजक. अनुवाद, कथालेखन, संपादनपर पुस्तके प्रसिद्ध.
डॉ. मृणालिनी शहा : उपाध्यक्ष
संस्थेच्या माजी कार्यवाह. 'भाषा आणि जीवन'च्या संपादन मंडळात सहभाग. मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड, पुणे येथे मराठीचे अध्यापन. 'मराठीचे भवितव्य', 'निवडक भाषा आणि जीवन' इत्यादी पुस्तकांच्या संपादनात सहभाग.
डॉ. नीलिमा गुंडी : कार्यवाह
'भाषा आणि जीवन'च्या संपादन मंडळात सहभाग. स.प. कनिष्ठ महाविद्यालयात मराठीचे अध्यापन. 'भाषाभान', 'शब्दांची पहाट' इत्यादी पुस्तके प्रकाशित. बालसाहित्य, समीक्षा, काव्यलेखन, 'वीस भारतीय भाषांमधील स्त्री साहित्याचा मागोवा' या बृहदप्रकल्पाच्या संपादनात सहभाग. दोन महाराष्ट्रराज्य पुरस्कार प्राप्त.
विजया चौधरी : सहकार्यवाह व कोशाध्यक्ष
संशोधनसंपादनात सहभाग, 'स्त्री साहित्याचा मागोवा खंड ३' मध्ये सहभाग.
डॉ. कल्याण काळे
'भाषा आणि जीवन'चे ८ वर्षे प्रमुख संपादक. पुणे विद्यापीठातील मराठीचे निवृत्त प्राध्यापक. भाषाविज्ञान, संतवाङ्मय या विषयावरील २० पुस्तके प्रकाशित. 'निवडक भाषा आणि जीवन'चे संपादक.
डॉ. विजया देव
'भाषा आणि जीवन' (त्रै) संपादन मंडळात सहभाग. भाषाविज्ञान, अनुवाद इत्यादी लेखन. 'समुद्राकाठचा गाव', 'व्हिएतनामी कथा' इत्यादी अनुवादित पुस्तके प्रसिद्ध. पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात अध्यापन.
डॉ. अंजली सोमण
एस.एन.डी.टी. महाविद्यालयातील मराठी विभागाच्या निवृत्त प्राध्यापिका. कथा, कादंबऱ्या, समीक्षालेखन, भाषाविज्ञान विषयकप्रकारचे लेखन. 'भाषांतरमीमांसा', 'विस्तारलेले क्षितिज' इत्यादी पुस्तकांच्या संपादनात सहभाग. 'मराठी कथेची स्थितिगती', 'तिमिरभेद' इत्यादी पुस्तके प्रकाशित.
मॅक्सिन बर्नसन
मराठी अभ्यास परिषदेच्या संस्थापक सदस्य, भाषाविज्ञानाच्या अभ्यासक. अमराठी मंडळींना मराठी शिकविण्यासाठी पुस्तिका तयार करण्यात पुढाकार. फलटण येथील मराठी माध्यमाच्या शाळेच्या कामकाजात व संवर्धनात महत्त्वाचा वाटा. भाषाशिक्षणविषयक अनेक प्रकल्पांमध्ये सहभाग.
डॉ. मिलिंद मालशे
आय.आय.टी मुंबई येथे इंग्रजीचे प्राध्यापक. अनुवाद, भाषाविज्ञान, सौंदर्यशास्त्र व समीक्षा या विषयांवर लेखन. आधुनिक भाषाविज्ञान, सौंदर्यशास्त्र व समीक्षा या विषयांवर लेखन. 'आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन' सह अनेक मराठी व इंग्रजी पुस्तके प्रकाशित. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे अभ्यासक व गायक.