मराठीचे डोळे. इंग्रजीची खिडकी.
मराठी अभ्यास परिषदेच्या वतीने, दरवर्षी, मराठीतील सर्वोत्कृष्ट भाषाविषयक लेखनासाठी, महाराष्ट्र बँकेच्या सहयोगाने, महाबँक पुरस्कार देण्यात येतो. ५००० रू. रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वर्ष २००८-०९ मध्ये, प्रसिद्ध झालेल्या भाषाविषयक लेखनाचा विचार करून डॉ. कलिका मेहता, डॉ. नीलिमा गुंडी आणि प्रा. रंजना फडके यांच्या समितीने श्री. माधव आचार्य (चौल, अलिबाग) यांनी लिहिलेल्या ध्वनिताचे केणे या पुस्तकाची निवड केली आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. १३ डिसेंबर २००९ रोजी सायंकाळी ठीक ५.३० वाजता एस. एम. जोशी सभागृह (चर्चासत्र सभागृह) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नागनाथ
कोतापल्ले यांच्या हस्ते होणार आहे. पुढे वाचा »
....मराठीत शिक्षण घेऊन मानाने समाजातल्या दोन भिन्न क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉ.अनिल अवचट आणि संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी मराठी अभ्यास परिषदेत मराठी शिक्षण घेऊनही जीवनात कसे समृद्धपण आले, याची केलेली चर्चा मराठी भाषकाना स्फूर्तिदायक ठरली.
पुणे, ता. १ मे २००८- ""मुलांचे भवितव्य घडविण्याच्या खटाटोपात पालक स्वतःचे जगणे विसरले आहेत. त्यांनी मुलांची विचारशक्ती स्वतःच्या ताब्यात घेतली आहे. ही कृती चुकीची असून, आपले मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य मुलांना द्या, त्यांना त्यांच्या अंगाने वाढू द्या,'' असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले....