मराठीचे डोळे. इंग्रजीची खिडकी.
'भाषाभान' हा डॉ० नीलिमा गुंडी यांच्या भाषाविषयक तेहेतीस लेखांचा संग्रह आहे. लेखिकेने सोयीसाठी त्यांचे दोन भाग केले आहेत; पण त्या भागांना शीर्षके दिलेली नाहीत. ललित आणि वैचारिक अशा कप्पेबंद विभागणीत मावणारे असे हे लेख नाहीत, याची लेखिकेला जाणीव आहे. लेखांचा आशय आणि स्वरूप पाहता त्यातील लेखांची थोडीफार वर्गवारी करता येते.... पुढे वाचा »